Beed News: बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे एका शाळकरी मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमले आहे.
बीड: तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका शाळकरी मुलीला मारहाण करत तिघांनी तिला बळजबरीने कारमध्ये बसवून नेत अपरहण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.