
शातच अजून एका घटनेने बीडमधील राजकारण गाजताना दिसत आहे
बीड: राज्यात बीड जिल्ह्यातील राजकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षांतर, आरोप - प्रत्यारोप, राजकीय व्यक्तींची वक्तव्ये आणि त्यांचं वैयक्तीक आयुष्य अशा विविध प्रकारे इथलं राजकारण नेहमी तापताना दिसतं. अशातच अजून एका घटनेने बीडमधील राजकारण गाजताना दिसत आहे. आता आमदार संदीप क्षीरसागर यांना एक धक्का बसला आहे. बीड नगरपालिकेतील त्यांच्या सोबत असणाऱ्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आमदार संदीप क्षीरसागरांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या 4 नगरसेवकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करत रामराम ठोकला आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. त्यामुळे पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेत वर्चस्व कमी होताना दिसत आहे.
जांबचा बैलबाजार फुलला...! आसपासच्या 5-6 जिल्ह्यातील लोकांची खरेदी-विक्रीसाठी...
ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसेनाला मोठं यश मिळालं आहे. 29 ग्रामपंचायतपैकी 21 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. अशातच बीड शहरातील काकू नाना विकास आघाडीमधील महत्त्वाचे नेते आणि नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैयासाहेब मोरे, रंजित बनसोडे या चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशाने आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
Gram Panchayat Election: जळकोटमधील ४३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
यापुर्वी श्रीरसागर कुटुंबात फूट पडली ती बीडच्या नगरपालिका निवडणुकांमुळेच. संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडी तयार केली होती आणि निवडणूक लढवली होती.