बीडच्या विकासाची सरकार अपेक्षापूर्ती करेल

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; बीडमधील रस्तेकामांचे ऑनलाइन भूमिपूजन
Beed road development works Online Bhumipujan
Beed road development works Online Bhumipujan

बीड : नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर, बीडचा कायापालट करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

६८ कोटी ८५ लाख रुपये खर्च करून शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या १२ रस्ते व नाली कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २०) सायंकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून केले.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथील कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ. दिपा क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, डॉ. सारिका क्षीरसागर, अरुण डाके, विलास बडगे, अमृत सारडा, विनोद मुळूक आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाडा दुष्काळी असला तरी पर्यटन, उद्योगाच्या वाढीसाठी सरकार काम करेल. रखडलेले प्रकल्पही सरकारने हाती घेतले आहेत. पश्चिमी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

गोगलगाई, यापूर्वीच्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची भरपाई दिली असून आताही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदानही त्यांच्या खात्यावर टाकले जात आहे. कामे वेगात आणि दर्जेदार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिवंगत गोपीनाथराव मुंडे व दिवंगत केशरबाई क्षीरसागरांचा हा जिल्हा असल्याने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या कामांचे उद्‍घाटने मी व शिंदे तेथे येऊन करू. विकासाला निधी कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय या केंद्र सरकारच्या धोरणानुसार बीडलाही मंजुरी द्यावी. बीडसाठी वेळ काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शहरात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून करण्यात आली.

या कामांची झाली सुरुवात

अंबिका चौक ते अर्जुन नगर, राजीव गांधी चौक ते करपरा नदी पूल, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट, बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन, कासट यांचे घर ते शहर पोलिस स्टेशन-अश्विनी दवाखाना, मसरत नगर ते नेत्रधाम- सावरकर चौक, शीतल वस्त्र भंडार, मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते, पेठ बीड पोलिस स्टेशन-ईदगाह ते नाळवंडी रस्ता, नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा, बार्शी रोड, मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद - फ्रुट मार्केट- खासबाग देवी रोड, अंकुश नगर ते पाण्याची टाकी या कामांना सुरुवात करण्यात आली.

लोकांनाही त्रास अन् क्षीरसागरांनाही

शहरातील अपूर्ण रस्ते कामांचा लोकांनाही त्रास झाला व त्याचा जयदत्त क्षीरसागरांनाही त्रास झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वाक्याचा रोख विधानसभेतील जयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाच्या कारणाशी होता. मात्र, त्या ‘प्रसववेदना’ होत्या असेही ते म्हणाले. डॉ. सारिका क्षीरसागर, फारुक पटेल यांनीही आपल्या भाषणात असे लोक म्हणत असले तरी रस्ते रखडण्यामागे व उखडण्यामागे इतरही कारणे असल्याचे म्हटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com