
Latest Beed News: संसदेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या तसेच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी व पवनचक्कीवरील भांडणे या चारही प्रकरणांचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वीच अपहण आणि खुन आणि अॅरटॉसिटी हे गुन्हे तपासासाठी सीआयडीकडे सोपविला होते. उर्वरित दोन गुन्हे पोलिस महासंचालकांच्या निर्देशाने वर्ग करण्यात आले. दरम्यान, चार गुन्ह्यांत एकूण नऊ आरोपी आहेत. यातील चौघे कोठडीत असून पाच जण फरार आहेत.
ता. नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घण खुन करण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार व कृष्णा आंधळे या सात जणांवर गुन्हा नोंद झाला.