Beed News : कराडवर पहिला वॉर क्षीरसागरांचा, मुंडेंच्या राजीनाम्याबाबतही सातत्य; खुन प्रकरण लावून धरण्यात धस पुढे

संतोष देशमुख यांचे प्रकरण लावून धरत मुख्यमंत्री आणि प्रशासन पातळीवर पाठपुरावा करण्यात भाजप आमदार सुरेश धस पुढे आहेत.
sandeep Kshirsagar
sandeep Kshirsagarsakal
Updated on

बीड - संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या झाली तेव्हा वाल्मीक कराड म्हणजे जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांसाठी अनभिषीक्त सम्राट अशी प्रतिमा असलेला. पण, त्यावेळी देशमुख खुनाच्या पाठीमागे वाल्मीकच हे नाव घेण्याचे धाडस सर्वप्रथम आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. विशेष म्हणजे तेव्हापासून धनंजय मुंडेंना मंत्रीपद नको आणि मंत्रीपदावर गेल्यांनतर राजीनामा मागणीतले सातत्यही त्यांनी ठेवले हे विशेष.

संतोष देशमुख यांचे प्रकरण लावून धरत मुख्यमंत्री आणि प्रशासन पातळीवर पाठपुरावा करण्यात भाजप आमदार सुरेश धस पुढे आहेत. मात्र, सुरुवातीला त्यांनी कराडचे थेट नाव न घेता ‘आका’ विशेषण वापरले. तर, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत थेट बोलण्याऐवजी त्यांच्याच पक्षाचे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी असून आपली नाही, असे म्हणून हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकारतला म्हणून चेंडू टोलवत.

ता. नऊ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खुन करण्यात आला. त्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आंदोलन झाले. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आंदोलनाला धार आली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तत्कालिन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेवरही खुनाचा गुन्हा नोंद झाला.

ता. ११ रोजी मस्साजोगला जाऊन घटनेच्या पाठीमागे वाल्मीक कराड असल्याचे ठोस वक्तव्य संदीप क्षीरसागर यांनी केले. त्यावेळी वाल्मीकची जी प्रतिमा आणि जिल्ह्यात चलती होती, तेव्हा त्याचे नाव घेणे म्हणजे धाडसच होते. पाच टर्मचे आमदार, मुख्यमंत्री आणि सरकारचे बॅकअप असूल्याने धसांचा आ्रकमकणपणा वावगा नव्हता.

पण आता विधीमंडळात पक्ष लहान, मागे कोणी मोठा लोकप्रतिनिधी नाही, अशा दुण्या बाजू असताना नाव घेणाऱ्या क्षीरसागरांनी पुढे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतरही खुनाच्या मागे वाल्मीकच या आरेापात आणि वाल्मीकला मुंडेंचे प्रोटेक्शन या आरोपात आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत सातत्य ठेवले हे विशेष. खासदार बजरंग सोनवणे यांनीही राजीनाम्याचा विषय लावून धरला. सुरुवातीला मुंडे व कराडवर आ्रकमकपणे आरोप करणारे सोळंके नंतर या विषयात मागे गेले.

छत्रपती संभाजीराजे यांनीही सुरुवातीपासून मुंडेंच्या राजीनाम्याला विरोध केला आणि गंभीर आरोपही केले. त्यांनी गुप्तपणे देशमुख कुटूंबियांना मदतही केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील पहिल्या दिवशीपासून या प्रकरणात राहीले आणि सातत्याने मस्साजोगला येत राहील्यानेच प्रकरणाला धार राहीली हे नाकारून चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com