Beed News: बीडमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या होमगार्ड तरुणीचा नाल्यात मृतदेह आढळला. प्रेमसंबंधातून वाद होऊन खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
बीड: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या, गृहरक्षक दलातील (होमगार्ड) तरुणीचा गुरुवारी (ता. २१) एका नाल्यात मृतदेह आढळला. तपासात ही खुनाची घटना असल्याचे समोर आले. अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६, रा. लुखासमला, ता. गेवराई) असे मृत तरुणीचे नाव आहे.