Beed News: लालपरी सुसाट; बीड विभागाची २१ कोटींची विक्रमी कमाई ;खासगी वाहतुकीला धोबीपछाड; ३४.२५ लाख किमी धावत विक्रमी भरारी, अढळस्थान कायम

Beed ST Division Revenue : दिवाळीच्या सुट्या आणि भाऊबीजेनिमित्त प्रवाशांच्या गर्दीमुळे बीड एसटी विभागाने १७ दिवसांत २०.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. आठ आगारांच्या बसगाड्यांनी ३४.२५ लाख किलोमीटर धाव घेतली. बीड आगार कमाईत, तर माजलगाव भारमानात अव्वल ठरले.
MSRTC buses witness heavy passenger traffic during the Diwali travel rush in Beed district.

MSRTC buses witness heavy passenger traffic during the Diwali travel rush in Beed district.

esakal

Updated on: 

बीड : दिवाळीचा सण, सलग सुट्या आणि भाऊबीजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बीड विभागाला यंदा विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. १ ते १७ नोव्हेंबर या १७ दिवसांच्या कालावधीत बीड विभागातील आठ आगारांच्या बसगाड्यांनी तब्बल ३४ लाख २५ हजार किलोमीटरची धाव घेत २० कोटी ७२ लाख ५७ हजार रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या मुख्य सात दिवसांतच (११ ते १७ नोव्हेंबर) विभागाच्या तिजोरीत ९ कोटी ९१ लाख ७५ हजार रुपये जमा झाले आहेत.

Loading content, please wait...