

Beed Stray Dog Menace
esakal
बीड: रात्रीची वेळ... बीड शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळीत शुकशुकाट पसरलेला असतो. अशा भयावह शांततेत अचानक आठ-दहा मोकाट कुत्र्यांची एक हिंस्त्र टोळी भुंकत एखाद्या दुचाकीस्वाराच्या अंगावर धावून जाते. तो आपला जीव वाचवण्यासाठी गाडी वेगात पळवतो, आणि थोडक्यात अनर्थ टळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाणाऱ्या एका निष्पाप चिमुकल्यावर हीच कुत्र्यांची टोळी बेसावध क्षणी हल्ला करते.
हे कुठल्या भयकथेतील दृश्य नाही, तर बीड शहरात दररोज घडणारे जीवघेणे आणि भयंकर वास्तव आहे! बीडकरांच्या उंबरठ्यावर साक्षात मृत्यू कुत्र्यांच्या रूपाने दबा धरून बसला आहे, आणि शहरातील नागरिकांचे रक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी असलेली नगरपालिका मात्र कुंभकर्णी झोपेत ढेंगाळत आहे. कुत्र्यांच्या उच्छादामुळे शहरात एक अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखी भयानक स्थिती निर्माण झाली आहे.