

Beed News
esakal
बीड: पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखण्यासाठी घराघरांत तसेच शाळा, कार्यालये, हॉटेल, दवाखान्यांत आरओ वॉटर प्युरिफायरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. या वाया जाणाऱ्या पाण्याच्या बचतीसंदर्भात येथील शाळकरी विद्यार्थ्याने संशोधन प्रयोग तयार केला आहे.