वा रे माझ्या पठ्ठ्या, सालगड्याचा मुलगा झाला अधिकारी

रामदास साबळे
Wednesday, 3 March 2021

सततच्या नापिकीमुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी भागविणे जिकीरीचे होते

केज (बीड): तालुक्यातील कुंबेफळ येथील शेतगड्याचा मुलगा गणेश गौतम थोरात हा शिक्षणातील जिद्द व चिकाटीच्या बळावर बँकेत प्रथम श्रेणी अधिकारी बनला आहे. त्याने घरच्या गरीबी परिस्थितीची जाणीव ठेवून मिळविलेल्या यशाबद्दल तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

कुंबेफळ येथील गौतम थोरात या सामान्य शेतकऱ्याला कोरडवाहू दीड एकर जमीन आहे. सततच्या नापिकीमुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी भागविणे जिकीरीचे होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च व मुलांचे शिक्षण भागविणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांनी घरची दीड एकर शेती बघून मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

देशसेवेनंतर माजी सैनिक रमला शेतात, चाळीस हजारांच्या गुतंवणुकीतून तीन...

मुलगा गणेशचे दहावी पर्यंतचे शिक्षण गावीच सिद्धीविनायक विद्यालयात झाले. शाळेत पुढील शिक्षण अंबाजोगाई व लातूर शहरात तर औरंगाबाद येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून ऍग्री बायोटेक ही पदवी घेतली. पदवी परिक्षेनंतर तो पुणे शहरातील वाघोली येथील अक्सिस बँकेच्या शाखेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत होता. एवढ्यावरच समाधानी न राहता त्याने अथक परिश्रमाने जिद्द व चिकाटीच्या बळावर अभ्यास करून भारतीय स्टेट बँकेने घेतलेल्या सर्कल बेस ऑफिसर पदाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.

Traffic Jam: जाफराबादेत सिमेंट रस्त्यांची कामं ठरतायेत वाहतूकीच्या कोंडीचे कारण...

सध्या त्याची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई विभागात सर्कल बेस ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल होत असलेल्या अभिनंदनाच्या वर्षावाने शिक्षणासाठी स्वतः च्या जीवाची तमा न बाळगणाऱ्या आई-वडीलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलगा अधिकारी झाल्याचे समजताच आई-वडीलांनी आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली. त्याचे सरपंच स्वर्णा किशोर थोरात यांच्यासह ग्रामस्थांकडून कौतूक केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Success Story Overcoming the situation farmer son became an officer