Beed: बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय? पाच शिक्षकांचे एकाच दिवशी निलंबन

Marathwada News डी. डी. अष्टेकर, लालसाहेब बळे, मनीषा नाईक या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
Beed: बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय?  पाच शिक्षकांचे एकाच दिवशी निलंबन
Updated on: 

Latest Beed News: वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन, अध्यापन केले नाही व आरटीई कायद्याचा भंग तसेच पोलीस ठाण्यातील गुन्हा आणि गैरहजेरी आदी विविध कारणांनी जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर शुक्रवारी (ता. २०) निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी याबाबत आदेश निर्गमित केले. एकाच दिवशी पाच शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील आष्टी (हरिनारायण) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्यापन न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. तसेच बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा भंग करणे व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी डी. डी. अष्टेकर, लालसाहेब बळे, मनीषा नाईक या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com