
परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचा विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काम सुरू करताना मंदिराची पुरातन ओळख पुसली जाणार नाही याचे जतन करुनच मंदिराचा कायापालट केला जाईल असे सांगण्यात आले होते.
मात्र सध्या पूर्व भागाच्या बाजूने दर्शन मंडपाचे काम सुरू करण्यात आले असून दक्षिण बाजूला असणाऱ्या सर्व पायऱ्या तोडून बांधकामासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे मंदिराची जुनी ओळख पुसणार तर नाही ना असा प्रश्न परळीकरांना पडला आहे.
--------------------------------------------