

Action underway for abetment to suicide based on audio clips
Sakal
बीड : खेळातील बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या आणि अखेर टोकाचे पाऊल उचलणाऱ्या वैभव छगन चव्हाण (वय २६, रा.नवगण राजुरी, ता.जि.बीड) याच्या मृत्यूप्रकरणी अखेर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी मला जीवाला धोका आहे असे सांगणाऱ्या वैभवच्या अनेक ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या, ज्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली होती. अखेर मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.