
परळी वैजनाथयेथील भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजी नगर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे यांची पदोन्नती होऊन आयकर आयुक्त, पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे. मुंडे हे तालुक्यातील कन्हेरवाडीचे भूमिपुत्र आहेत. आयआरएस विश्वास मुंडे यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी येथे झाले व पदवी बीटेक केमीकलमध्ये रासायनिक अभियांत्रिकी नागपूर येथे झाली.