
बीड : पंधरा लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये, अन्यथा घरात राहू देणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच मंगळसूत्र, मोबाईल आणि जोडवे हिसकावून तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. या प्रकरणी सासरच्या चौघांवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.