Beed News: पावणे दोन लाख महिलांच्या उत्पादनांना मिळणार झळाळी; जिल्ह्यात उभारणार पॅकेजिंग युनिट, जिल्हा योजनेच्या योजनेतून दीड कोटीची तरतूद
Beed District to Launch Packaging Units for Women’s SHG Products: बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना आता झळाळी व ब्रॅंडिंग मिळणार. पॅकेजिंग युनिट उभारून १८ हजार गटातील १.८४ लाख महिलांच्या वस्तूंची बाजारपेठ वाढवण्याची योजना.
बीड : सुरवातीला महिला बचत गटांच्या उभारणीतून महिलांचे संघटन आणि यातून थोडीफार आर्थिक बचत सुरू झाली. त्यामुळे महिलांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. पुढे बचत गटांच्या महिलांनी स्थानिक उत्पादनेही सुरू केली.