

Beed ZP School Students Reporting
ESakal
अनंत जाधव
लाखो रुपये खर्च करुन प्रशासनाकडून शिक्षणासाठी शाळा उभारल्या जातात पण विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढणार आणि उद्याचे भविष्य कसे घडणार? असे सवाल सध्या सोशल माध्यमावर उपस्थित होत आहे. असाच शिक्षक नसल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.