
औसा : औसा तालुक्याला औद्योगिक क्रांतीच्या मार्गावर नेणारा २४८ हेक्टरवरील बेलकुंड-चिंचोली सोन एमआयडीसी प्रकल्प आता गती घेणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून जमीन मोजणी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या फी संदर्भात ९ कोटी १८ लाखांचा धनादेश भूमिअभिलेख कार्यालयाला सुपूर्द करण्यात आला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर आहे.