वैद्यकीय क्षेत्र सेवा प्रदान करण्याचे सर्वोत्तम माध्यम- अशोक चव्हाण    

फोटो
फोटो

नांदेड : “मानव सेवा हीच, इश्‍वर सेवा आहे. ” वैद्यकीय क्षेत्र सेवा प्रदान करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत करणाऱ्या वैद्यकीय सेवेला बळकट करण्यासाठी शासन सर्वोतोपरीने सहाय्य करण्यास कटीबध्द आहे. असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.    

येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, शोभा नगर, नांदेड कै. शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबीर व वाचनालयाचे उद्घाटन तसेच पोर्णिमानगर येथील स्थलांतरित आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यांची होती उपस्थिती 

यावेळी महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, माजी महापौर शैलेजा स्वामी, माजी आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरीकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,  नगरसेविका प्रकाशकौर खालसा, नगरसेवक किशोर स्वामी, उमेश पवळे, अजितपालसिंघ संधू, आनंद पवळे, विरेंद्रसिंग गाडीवाले आदी मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, नागरिक आदींची उपस्थिती होती .

अभ्यासिकेसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, नांदेडचा नावलौकीक आता येथील उत्कृष्ट शिक्षणामुळे राज्यभर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध असणाऱ्या अभ्यासिकेसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आपलं शहर सुंदर असायला हवे. शहरात होर्डींग विनापरवानगी लावण्यात येवू नयेत. रितसर मार्गाने परवानगी घेवूनच होर्डींग लावावेत. जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित असलेली विकासात्मक कामे पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. जनतेच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून समान्य माणसाला मदत करण्याच्या हेतूने शासन कार्य करणार आहे. 

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यातही होता वाघांचा अधिवास : पण...
 
आरोग्य केंद्राची केली पाहणी

नांदेड शहर महानगरपालिकेच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथील डॉ. राम मनोहर लोहिया ग्रंथालय, स्थलांतरित प्राथमिक आरोग्य केद्राचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली व माहिती घेतली. व उपस्थित अधिकाऱ्यांना मौलीक सुचनाही दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com