esakal | जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरूच, बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक
sakal

बोलून बातमी शोधा

arrest11111_2017082746

आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजांकडे यंदा गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरूच, बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : आयपीएल सामने सुरू झाल्यानंतर सट्टेबाजी सुरु होते. याची मागील तीन वर्षे जालना जिल्ह्याने अनुभूती घेतली आहे. मात्र, असे असताना ही आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजांकडे यंदा गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात दिवसढवळ्या सट्टेबाजीच्या चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.

लातूरकर तरुणाचा आगळावेगळा विक्रम, दुचाकीने तेरा दिवसांत आठ हजार किलोमीटर केला...

दरम्यान आयपीएल सट्टेबाजीसंदर्भात 'सकाळ'ने ता.३० सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर रविवारी (ता.चार) रात्री शहरातील संग्रामनगरमध्ये ओट्यावर बसून आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर सट्टा घेणाऱ्या मुख्य बुकी विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजीचा गोरखधंदा सुरूच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.


जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर या सामन्यांवर सट्टेबाजी होते. मागील तीन वर्षांत आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांसह सट्टा घेणाऱ्या अनेकांवर गुन्हा दाखल झाले आहेत. मात्र, हा सट्टेबाजीचा बाजार अद्यापी सुरूच आहे. त्यात यंदा आयपीएलचे सामने सुरू झाल्यानंतर पोलिसांनी या सट्टेबाजीच्या बाजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या शहरात सट्टेबाजांची मोबाइलवरून संभाषणे ऐकण्यास मिळत आहेत.

पन्नास हजार रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्या; मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा,...

यंदा 'आयपीएल सट्टेबाजीबाबत जिल्ह्यात 'शांतता' कशी यासंदर्भात 'सकाळ'ने ता. ३० सप्टेंबर रोजी बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर अखेर पोलिस कामाला लागले आहेत. रविवारी (ता.चार) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील संग्रामनगर येथील एका हॉटेल समोरील मोकळ्या ओट्यावर बसून सट्टा घेणाऱ्या बुकी जीवन फुलचंद भगत (वय ३५, रा.संग्रामनगर, जालना) याला चेन्नई सुपरकिंग विरूद्ध पंजाब किंग्ज ११ या सामन्यावर सट्टा घेताना अटक करण्यात आली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला भामट्यांचा गंडा !

त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइल असा एकूण चार हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर जीवन भगत याच्यासह त्याचा मुख्य बुकी असे दोघांविरोधातही सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सट्टा घेणाऱ्या मुख्य बुकीच्या मुसक्या आवळण्यात अजून पोलिसांना यश आलेले नाही. मात्र, कारवाईनंतर शहरातील गल्लीबोळात आयपीएलवर सट्टा लावला जात आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासनासह त्यांचे सायबर सेल या आयपीएल सट्टेबाजांना रोखणारा का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


आयपीएलवर सट्टे घेणाऱ्याला अटक केली आहे. तसेच मुख्य बुकीला ही आरोपी करण्यात आले आहे. ज्यांनी या सट्टा घेणाऱ्याकडे सट्टा लावला आहे, त्यांनीही अटक केली जाईल.
- राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,जालना.

संपादन - गणेश पिटेकर