
-(रविंद्र गायकवाड)
बिडकीन : भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण मानला जाणारा आणि बैलां प्रति कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा भाद्रपदी बैलपोळा हा सण संपूर्ण बिडकीन सह परिसरात आज (ता.०२) सोमवारी रोजी साजरा करण्यात आला.पोळ्यानिमित्त बिडकीन (ता.पैठण) येथील मारोती मंदिर,बाजारतळ व कोकणवेस मारोती मंदिर,पैठण वेस मारोती मंदिर येथे बैलांची विधिवत पूजा करून त्यांची मिरवणूक काढत दर्शन घेत पोळा साजरा करण्यात आला. ज्यांच्याकडे बैल नाहीत असे लोकदेखील बैलांप्रति कृतज्ञता दाखविण्यासाठी मातीचे अथवा लाकडाचे तयार केलेले बैल पुजतात.