esakal | राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

परभणी: राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी येत्या ५ तारखेपासून मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी ५ ऑगस्टला नांदेडमध्ये येणार आहेत. पाच तारखेला नांदेडला मुक्काम करून सहा तारखेला सकाळी ते हिंगोलीकडे निघणार आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर त्याच दिवशी राज्यपाल परभणी जिल्ह्याच्या मुक्कामी दौऱ्यावर असणार आहेत. राज्यपालांचा हा दौरा जिल्हा प्रशासनास मंगळवारी सकाळपर्यंत अधिकृतरित्या प्राप्त झाला आहे.

राज्यपाल कोश्यारी सहा ऑगस्टला हिंगोलीहून सांयकाळी सहा वाजता परभणीत मुक्कामी दाखल होणार आहेत. सात ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दूपारी दीड वाजेपर्यंत ते थांबून नांदेडकडे रवाना होणार आहेत. नंतर सायंकाळी ते नांदेडहून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला, विद्यापीठ प्रसासनास सूचना प्राप्त झाल्या असून प्रशासनाची लगबग देखील सुरु झाली आहे.

loading image
go to top