esakal | कराडांच्या निवडीनंतर जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

कराडांच्या निवडीनंतर जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र कोरोना नियमांचे भान न बाळगता जल्लोष केल्याने भाजपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. कराड यांचा शपथविधी सोहळा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर बेभान होऊन जल्लोष केला. त्यामुळे वेदांत नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुनील शामलाल पांडे यांच्या फिर्यादीवरून समीर राजूरकर, राजू शिंदे, प्रशांत देसरडा, राजगौरव वानखेडे, अनिल मकरीये, रामेश्वर भादवे, बालाजी मुंटे, प्रा. गोविंद केंद्रे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, मनिषा मुंढे, अमृता पालोदकर यांच्यासह इतर ५० ते ६० जणांच्या विरोधात वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image