मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ. कराड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, राज्य सरकार विकसित कामाकडे दुर्लक्ष करत आहे. या सरकारने नियोजित विकास कामाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ. कराड

हिंगोली: मराठवाड्याचा शैक्षणिक व सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिंगोली येथील पत्रकार परिषदेत बुधवार सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, राज्य सरकार विकसित कामाकडे दुर्लक्ष करत आहे. या सरकारने नियोजित विकास कामाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले. सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाणार आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन अनुशेष संदर्भात चर्चा करून राज्य शासनाकडे त्याची शिफारस करणार आहे.

हेही वाचा: Rain Update: मराठवाड्यात कुठे हलका, कुठे मध्यम तर कुठे दमदार पाऊस

बंद असलेले डेव्हलपमेंट बोर्ड सुरू करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन बोर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी फसल विमा योजना केंद्राची आहे. यात केंद्र व राज्य मिळून पैसे देते राज्याने ज्या कंपनीकडे काम दिले ती कंपनी ऍवरेज उत्पन्न काढते यासाठी संबंधित तीन अधिकारी पंचनामा करतात. मात्र तो टेबल पंचनामा होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. यामुळे लाभार्थी या पासून वंचित राहत आहेत. यासाठी संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न निकाली काढणार आहे, असंही मंत्री कराड यावेळी म्हणाले.

हेही वाचा: Marathwada Corona Update: २४ तासांत १८५ नवीन रुग्ण, बीड आघाडीवर

मराठवाड्यात नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या जनसंवाद यात्रेचा तिसरा दिवस आहे. बीड, नांदेड व आज हिंगोलीत यात्रा आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत यात्रा सुरू असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचावा व या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व लाभार्थ्यांना मिळावी यासाठी भाजपाने जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. कराड यांनी दिली.

Web Title: Bhagwat Karad Said Will Try To Cover Backlog Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..