

Beed News
esakal
बीड: पावसाळ्याच्या सुरवातीला हातात रोपटं घेऊन हसऱ्या चेहऱ्याने फोटो काढणारे शासकीय अधिकारी आणि नेत्यांचा लवाजमा आपण दरवर्षी पाहतो. झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणांनी आसमंत दुमदुमतो, पण उन्हाळ्याच्या पहिल्या झळा लागताच हेच हसरे चेहरे आणि ती लाडकी रोपटं कुठे गायब होतात? आज बीड जिल्ह्याची जी लाहीलाही होत आहे, तापमान ४३ अंशांच्या पुढे जाऊन जो चटका बसत आहे, तो केवळ निसर्गाचा कोप नाही.