
भोकर : तालुक्यात दर्जेदार शिक्षणासोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक शाळेत स्वच्छतागृह उभारण्यात आले असले तरी तेथे पाणीच नसल्या कारणाने त्याचा वापर होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशीच अवस्था भोकर शहरामधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेची आहे. येथे स्वच्छतागृह आहे. परंतु, पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर उघड्यावर लघुशंकेसाठी किंवा शौचास जावे लागते.