दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

सोशल मीडियावरील बॅनर पाहून आखला चोरीचा प्लॅन; आंतरजिल्हा चोरांच्या टोळीला अटक.
Robbery plan hatched seeing social media banners; Interstate gang arrested.

Robbery plan hatched seeing social media banners; Interstate gang arrested.

Sakal

Updated on: 

भोकरदन : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दगडवाडी ता. भोकरदन येथील शुक्रवारच्या दुष्काळी पाहणी दौऱ्याचे बॅनर दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होते. या दौऱ्याला मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांची गर्दी होणार असल्याचा अंदाज घेत चोरट्यांनीही गर्दीत हात साफ करण्याचा डाव आखला. मात्र, मंत्री बावनकुळे यांना दगडवाडीला पोहोचण्यास उशीर झाल्याने गर्दीच्या आडून चोरी करण्याचा त्यांचा प्लॅन काही प्रमाणात फसला. अखेर रात्री त्यांनी एका दुचाकीस्वाराला गाठत चाकूचा धाक दाखवून १२ हजारांची रोकड लुटली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com