

Jalna News
esakal
भोकरदन (जि. जालना): सध्या सर्वत्र सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक, जीवघेणा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने चक्क घरगुती एलपीजी छोट्या सिलिंडरचे बेकायदेशीर कनेक्शन दुचाकीला जोडून शहरात फिरत स्वतःसह नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याचे उघड झाले. शनिवारी (ता. १६) मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार समोर आला.