Bhokardan Police Action: भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बचत गटाच्या महिलांचे चोरी गेलेले ८.८० लाख परत

भोकरदन पोलिसांची मध्यप्रदेशपर्यंत धाडसी मोहीम; अवघ्या काही तासांत चोरट्यांचा शोध घेऊन ८ लाख ८० हजारांची रोकड हस्तगत, बचत गटाच्या महिलांना दिलासा
Bhokardan Police Action

Bhokardan Police Action

Sakal

Updated on

भोकरदन : बचत गटाच्या महिलांच्या आयुष्यभराच्या कष्टातून साठविलेल्या ९ लाख रुपयांच्या चोरीमुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काही क्षणांत हातातून गेलेली ही रक्कम परत मिळेल, अशी आशाही महिलांनी सोडली होती. मात्र, भोकरदन पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपी निष्पन्न केले आणि आरोपींकडून ८ लाख ८० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश मिळविले. हस्तगत केलेली रक्कम मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलांच्या स्वाधीन करण्यात आली. कष्टाचे पैसे पुन्हा हाती पडताच अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. यावेळी त्यांनी भोकरदन पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com