Bhoom Sand Mafia : भूम तालुक्यातील बाणगंगा नदी पात्रात अवैध वाळू उपसा चालू; पोलिसासमवेत असणारा टिपर गेला कुठे ?
Illegal Sand Mining : भूम तालुक्यातील बाणगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केल्यावर वाळू माफियांनी शेतकऱ्यांना मारहाण केली असून पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत संपूर्ण प्रकार घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भूम : भूम तालुक्यातील बाणगंगा नदी पात्रामधून वाळू माफिया कायम वाळूचा उपसा करत असून हा वाळू उपसा पोलीस प्रशासन व महसूल यांच्या कृपाशीर्वादानेच होत असल्याचे या भागातील नागरिकांमधून बोलले जात आहे .