भोकरदन - राज्यातील महायुती सरकारकडून विविध समित्यांच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये असलेले संतोष दानवे हे पंचायतराज समितीच्या माध्यमातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
पंचायत राज वर "दानवे "राज
पंचायत राज च्या माध्यमातून हे पद तीस वर्षानंतर दानवेंच्याच घरात पुन्हा एकदा आले आहे. संतोष दानवे यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे युती सरकारच्या काळात पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते. रावसाहेब दानवे यांची त्यावेळची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहील पंचायत राज समितीच्या बुलढाणा येथील दौऱ्यात जलसिंचन विभागातील एका उपअभियंताने चुकीची माहिती दिल्यामुळे रावसाहेब दानवे यांनी त्याच्यावर कारवाईसाठी विधिमंडळाच्या हक्क भंग समिती समोर प्रस्ताव ठेवला होता.
व दानवेंच्या सूचनेनुसार विधिमंडळात त्यावेळेस त्या अभियंत्याला शिक्षा देखील झाली होती. तीस वर्षानंतर रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना योगायोगाने हे पद मिळाले आहे. रावसाहेब दानवे पेक्षा संतोष दानवे यांची कार्यशैली व पद्धत ही जरी वेगळी असली तरी झटपट व रोखठोक भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहे.
संतोष दानवे हे तिसऱ्यांदा निवडून आले असून पंचायतराज समितीच्या या पदावर काम करताना वडील रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकीर्दीचा अनुभव त्यांना कामात येणार आहे.
असाही योगयोग! चौथ्यांदा भोकरदन ला पद
अजित पवारांना ज्याप्रमाणे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले तसाच योगायोग भोकरदन तालुक्याला चौथ्यांदा पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पहिल्यांदा 1985 ते 90 च्या कार्यकाळात काँग्रेसचे आमदार संतोष राव दसपुते हे पंचायत राज समितीचे अध्यक्ष राहून गेले त्यानंतर युती सरकारच्या काळात 95 ते 99 दरम्यान रावसाहेब दानवे अध्यक्ष होते तर आघाडी सरकारच्या कार्यकाळात अजित पवारांचे जवळचे ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत दानवे यांना अध्यक्ष पद मिळाले होते. आता महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वात युवा आमदार संतोष दानवे यांना हे पद मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.