

A 30-year-old worker dies after a Poclain machine falls on him during pipeline work in Bhum.
eSakal
भूम : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर पडून मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. दोन) दुपारी घडली. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवायचा नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.