Tomato Cultivation : अवघ्या दोन एकरात घेतले १४ लाखांचे टोमॅटो पीक

मौजे सुकटातील दोन युवा शेतकऱ्यांची कमाल; कुटुंबाला दिला आधार
Tomato
Tomatoesakal

भूम : कृषी क्षेत्रातील शिक्षणाची आवड व भावंडांच्या सहकार्याने वडिलोपार्जित शेतीमध्ये दोन एकर क्षेत्र टोमॅटो लागवडीसाठी शेणखत व ड्रीपच्या माध्यमातून शेती करून आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने टोमॅटो लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेणारा युवक विजय शिवाजी भडके व धनाजी शिवाजी भडके या भावंडाने कृषी क्षेत्रातील शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीची अपेक्षा न करता उत्तम शेती करून आपले व आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करू शकता असे उदाहरण भूम तालुक्यातील मौजे सुकटा येथील भडके भावंडांनी करून दाखवले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ भाग म्हणून ओळखले जाणारे भूम तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले रामगंगा तलावाच्या बाजूला असलेले सुकटा गावातील राहणारे विजय शिवाजी भडके हे एमएससी फिजिक्स, ॲग्री डिप्लोमा शिक्षण घेऊन वडिलोपार्जित शेतीत स्वतःच्या भावासोबत एकत्रितपणे शेती करत आहेत याचा निसर्गाने मोबदला टोमॅटो उत्पादनातून दिला असल्याने सर्वत्र तालुका जिल्हा परिसरात भडके भावंडांचे कौतुक केले जात आहे.

Tomato
Marathwada Rain Update : माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस; पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी...

विजय भडके यांनी दोन एकर शेतीसाठी ड्रीपची व्यवस्था करून दोन एकर प्लॉट त्याच्यामध्ये दोन ट्रॅक्टर शेणखत घालून व मिश्र खताचा डोस टाकणे टोमॅटो लागवडीसाठी क्षेत्र तयार करून जवळपास १७ हजार टोमॅटोचे रोप आणून आपल्या शेतामध्ये लागवड केली त्याच्यानंतर टोमॅटो वर येणारे रोग बुरशी, करपा, बुरी, दावणी, नाग आळीआदी रोगापासून टोमॅटोचा बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या फवारण्या करून प्रत्येकी आठ दिवसाला फवारणी करून पिकाची जोपासना केली.

Tomato
Marathwada Rain Update : नांदेड, हिंगोलीत पावसाची रिमझिम; १५.५० मिलिमीटर पावसाची नोंद

स्वतःच्या काष्टाला व निसर्गाच्या सहकार्याने विजय भडके यांनी दीड लाख रुपयांपर्यंतचा खर्च टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी केला असताना अखेर त्यांच्या पदरात १४ लाख रुपयांचे उत्पादन पडले असून यासाठी त्यांना मोठ्या शहरातील मार्केटकडे धाव न घेता त्यांनी नजीकच्याच भूम, परांडा, नगर, बार्शी सारख्या शहरांमध्ये आपला टोमॅटो विक्री केला असून त्यांना एका कॅरेट साठी

जास्तीत जास्त भाव २४७० रुपये मिळाला असून यांना या उत्पादनातून चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा झाला असल्याने उत्तम नोकरी मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती या ब्रीद वाक्याला आळा घालत विजय भडके यांनी उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे बोध घेण्यासारखे उत्तम रीतीने शेती व्यवसायातून आपल्या कुटुंबाला हातभार लावला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Tomato
Marathwada Rain News : मराठवाड्यातील १४८ मंडळांत अतिवृष्टी

शिक्षण पूर्ण करून नोकरीची वाट न पाहता आम्ही वडिलोपार्जित शेती करावयाचे ठाम निर्धार करून नगदी पीक घेण्याचे मानस धरून सतत भेंडी, कोथिंबीर, टोमॅटो आधी पालेभाज्या लागवड करून त्याच्यातूनच आर्थिक फायदा निर्माण करत आहोत. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी वार्षिक पिकांकडे कौल न देता जर आपण नगदी पिकाच्या हिशेबाने पाहिले तर वर्षातून तीन ते चार पिके आपल्या पदरात पडतात अशा हिशेबाने फळभाज्या लावणे व कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य करावे.

-धनाजी भडके, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com