Tushar Kokani
sakal
बिडकीन : बिडकीन–दहेगाव बंगला मार्गावरील गिधाडा गावाजवळ शनिवारी (ता. २६) पहाटे दुचाकीचा अपघात होऊन ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तुषार बन्सीलाल कोकाणी (वय-३०, रा. न्यू रेसीडेन्सी, बिडकीन) असे मृताचे नाव आहे. या घटनेने बिडकीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.