Beed Newssakal
मराठवाडा
Beed News: विकासकामांपेक्षा विमानतळाची चिंता; जिल्ह्याच्या आराखड्यातील ५७५ कोटींची मात्र प्रतीक्षा
Infrastructure Development: बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रस्तावित ५७५ कोटी रुपयांचा आराखडा असतानाही सध्या केवळ ४० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. खासगी विमानतळाच्या पाहणीसाठी हा निधी दिला जात असताना अन्य महत्त्वाचे विकास कामे अडकली आहेत.
बीड : जिल्हा विकासाचा ५७५ कोटी रुपयांचा आराखडा असताना आतापर्यंत केवळ ४० लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे हा निधीही चक्क प्रस्तावित विमानतळाच्या जागेच्या पाहणीसाठी आहे.