
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अनोळखी भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी (ता.दहा) सायंकाळी घडली. अहमदपूर - अंबाजोगाई महामार्गावरील किनगावजवळ सम्राट पेट्रोल पंपाच्या पुढे वळण रस्त्यावर एका दुचाकीस्वारास अनोळखी वाहनाने धडक दिली.