Road Accidentsakal
मराठवाडा
Road Accident : जिंतूर-जालना महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Accident News : जिंतूर-जालना महामार्गावरील चारठाणाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. अपघात मंगळवारी रात्री झाला.
चारठाणा : जिंतूर-जालना महामार्गावरील चारठाणाजवळील एका ढाब्यासमोर मंगळवारी (ता. १३) रात्री पावणेआठच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली.

