
करमाड : हॉटेलची ड्युटी संपल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील देमणी फाटा येथे बुधवार (ता.२१)मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली दरम्यान रिमझिम पाऊस सुरू असल्याने ही घटना लवकर लक्षात आली नाही.