घार हिंडे आकाशी... तिने अडवले ‘फोर जी’!

चाकूर - घारीचे पिल्ले व घरटे मनोऱ्यावर असल्यामुळे बीएसएनएलच्या फोर जीचे काम करण्यास कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.
चाकूर - घारीचे पिल्ले व घरटे मनोऱ्यावर असल्यामुळे बीएसएनएलच्या फोर जीचे काम करण्यास कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

चाकूर - देशात सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या ‘बीएसएनएल’ने २०१८ मध्ये सर्वांत उशिरा ‘फोर जी’ मोबाईल सेवा सुरू केली. त्याला अपवाद चाकूर येथील दूरसंचार केंद्र आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावर घार या पक्ष्याचे घरटे असून, त्या घारीच्या घरट्यामुळे येथील फोर जी सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.

फोर जी सेवा कंत्राटदार कर्मचारी मनोऱ्यावर काम करण्यास चढले असता त्यांना घार येऊन चावा घेत आहे. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे. घारीच्या घरट्याशेजारी पटक्‍यांचे आवाज करण्यात येत आहेत. त्यामुळे आवाजांना घाबरून घार काही वेळांसाठी दूर जाते. थोड्या वेळाने घार परत मनोऱ्यावरील घरट्याकडे येत असल्यामुळे काम करणारे कर्मचारी काम करण्यास तयार होत नाहीत.

‘फोर जी’ सेवेचे साहित्य काही महिन्यांपूर्वी चाकूर येथील दूरसंचार कार्यालयात येऊन पडले आहे. प्रशासनाची उदासीनता व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे दूरसंचार अधिकाऱ्यांना घारीचे निमित्त सापडले आहे. तालुक्‍यातील नळेगाव, आष्टामोड, चापोली, वडवळ नागनाथ उपकेंद्रावर ‘फोर जी’ मोबाईल सेवा सुरळीत सुरू झाली आहे; मात्र तालुक्‍याचे ठिकाण असूनही चाकूरला अद्याप फोर जी सेवा सुरू करण्यात आली नाही. ही सेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

असंख्य ग्राहकांनी सरकारी असलेल्या बीएसएनएल सेवेचा हात अजूनही सोडला नाही. कॉलमध्ये येणारे व्यत्यय, इंटरनेट स्पीड कमी यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये ऑनलाइन आहेत. चाकूर दूरसंचार विभाग डिजिटल इंडियापासून सध्या तरी दूर आहे, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com