
अगोदर गावकऱ्यांनी कावळ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केले. पण त्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
बीड : परभणी पाठोपाठ बीड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने प्रवेश केला आहे. मूगगाव (ता.पाटोदा) येथे दोन दिवसांपूर्वी 26 कावळे मृतावस्थेत आले होते. कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला? यासाठी त्यांचे अवशेषाचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता.11) आला. यात कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे पथक मूगगावात तळ ठोकून आहे.
अगोदर गावकऱ्यांनी कावळ्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केले. पण त्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक मूगगावमध्ये दाखल झाले. त्याने गावाची पाहणी केली. मृत पावलेल्या कावळ्यांचे अवशेष भोपाळ येथील आयसीएआर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यात कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited - Ganesh Pitekar