
कावळ्यांचा मृत्यु बर्ड फ्लुने झाला की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट नसले तरी प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे.
लातूररोड (लातूर): येथे वेगवेगळ्या ठिकाणी सहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ही बाब बुधवारी (ता.१३) सकाळी गावकऱ्यांना निर्दशनास आली.यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कावळ्यांचा मृत्यु बर्ड फ्लुने झाला की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट नसले तरी प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे.
लातूररोड गावात वेगवेगळ्या ठिकाणी पाच कावळे मृत्युमुखी पडलेले दिसून आले, तर तहसील कार्यालयाच्या जवळ एक कावळा मृत अवस्थेत आढळला आहे. गावकऱ्यांनी याची माहिती तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांना दिल्यानंतर त्यांच्यासह नायब तहसीलदार शेषेराव टिप्परसे, चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे, माजी सरपंच मधुकर मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली मृत कावळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तपासणीसाठी लातूर येथे पाठविले आहेत.
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
नेमके या कावळ्यांचा मृत्यु बर्ड फ्लुने झाला की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट नसले तरी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.गावाच्या जवळपास असलेल्या सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली आहे.देशात सर्वत्र बर्ड फ्लुने डोके वर काढले असताना अचानक या कावळ्याच्या मृत्युमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कावळ्याच्या मृत्युचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार असून तहसील कार्यालयात पशुधन विकास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन सुचना दिल्या आहेत. डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर
(edited by- pramod sarawale)