esakal | जन्म गाव नागपूर असलं तरी पुनर्जन्म निलंग्याने दिला; मुख्यमंत्र्यांना आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी (ता. एक) येथे आली. या निमित्त आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.  ता. २५ मे २०१७ रोजी कार्यक्रम संपल्यानंतर परत जात असताना फडणवीस यांचे येथे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता.

जन्म गाव नागपूर असलं तरी पुनर्जन्म निलंग्याने दिला; मुख्यमंत्र्यांना आठवण

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा : माझे जन्मगाव नागपूर असले तरी निलंग्याने मला पुनर्जन्म दिला आहे. त्यामुळे माझं या गावाशी वेगळे नाते आहे, असे भावनिक मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर अपघातातील घटनेला उजाळा दिला.

फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी (ता. एक) येथे आली. या निमित्त आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.  ता. २५ मे २०१७ रोजी कार्यक्रम संपल्यानंतर परत जात असताना फडणवीस यांचे येथे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला होता. यात ते बालंबाल बजावले होते. एक प्रकारे त्यांचा हा पुनर्जन्मच होता. आज महाजनादेश यात्रेनिमित्त येथे सभा झाली.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दोन वर्षापूर्वी झालेल्या घटनेला या निमित्ताने उजाळा दिला. निलंग्याचे नातं वेगळे असल्याचे सांगून ते म्हणाले की, माझी जन्मभूमी नागपूर असली तरी मला पुनर्जन्म देणारे निलंगा हे गाव आहे. त्यामुळे या गावाशी माझं वेगळं नातं आहे. या गावाला मी कधीही विसरणार नाही, असे भावनिक उदगारही त्यांनी काढले. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवण्यासाठी व या गावांला परत येण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top