esakal | Video: भाविकांविनाच ‘श्रीराम’जन्मोत्सव 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत.

Video: भाविकांविनाच ‘श्रीराम’जन्मोत्सव 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मसोहळा गुरुवारी (ता. दोन) शहरातील प्रत्येक मंदिरात भाविकांविनाच पार पडला. पुजारी व इतर दोघे असे मिळून तिघांच्या किंवा चौघांच्याच उपस्थितीत रामनवमीचा उत्सव पार पडला. आजपर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जी भाविकांशिवाय राम जन्मोत्सव सोहळा पार पडला.

परभणी शहरातील गांधी पार्क व कोमटी गल्ली या दोन ठिकाणी मोठे व पुरातन राममंदिरे आहेत. गांधी पार्कमधील टाकळकर यांचे राममंदिर, तर पुरातन काळापासूचे आहे. तसेच कोमटी गल्लीतील राममंदिरही जुनेच आहे. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषत: महिलांची या दोन्ही मंदिरांत मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्याही मंदिरात पुजाऱ्याशिवाय इतर कोणीही जाताना दिसत नाहीत. दररोज सकाळी व सायंकाळी पूजा, आरती करण्यासाठी पुजाऱ्यांना मात्र, मंदिरात जावे लागत आहे. गुरुवारी (ता. दोन) रामनवमी उत्सव होता. यामुळे शहरातील गांधी पार्क परिसरात असलेल्या टाकळकर यांचे राममंदिर, कोमटी गल्लीतील राममंदिर, सुभाष रोडवरील बालाजी मंदिर आदी ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या वर्षी या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या जन्मोत्सवाला पुजारी वगळता एकही नागरिक सहभागी झाला नाही.

हेही वाचा - कामगार, गरिबांच्या मदतीसाठी अन्नधान्य जमा करणार - आमदार बालाजी कल्याणकर


रामफळदेखील मिळाले नाही
राम जन्मोत्सवाचा प्रसाद म्हणून रामफळाची मागणी असते. परंतु, यंदा या परिस्थितीमुळे बाजारात रामफळ विक्रीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे अनेकांना विनारामफळाचा उत्सव साजरा करावा लागला.
 

हेही वाचा - परभणीत तब्बल १८८ कोरोना संशयित !

आजपर्यंतची ही पहिलीच वेळ
मी जसा पाहतो तसे राम जन्मोत्सवासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. कारण प्रभू राम हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. सर्वजण त्यांच्या चरणी लीन होतात. परंतु, यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव विनालोकांचाच साजरा करावा लागला. ही घटना माझ्या आयुष्यातील पहिलीच घटना आहे.
- प्रकाश बारबिंड, पुजारी, परभणी

 

loading image