
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात भाजपच्या वतीने विभागणी करून दोन तालुकाध्यक्षाची निवड करण्यात आली. यामध्ये वडोद बाजार आणि बाबरा सर्कल मधून डॉ. गोपाल वाघ तर गणोरी आणि पाल सर्कल मधून सुचित बोरसे यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली. या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (ता.२०) सत्कार करण्यात आला.