Local Body Elections: स्थानिक निवडणुकींसाठी भाजप सज्ज; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती
Ravindra Chavan: परभणी जिल्ह्यातून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीचा आरंभ केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक योगदानावर भर दिला आहे.
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (ता. सात) येथे दिली.