पंकजा मुंडेंनी ट्विट करून दिलंय इंटरेस्टिंग चॅलेंज ! 'ते' तुम्हाला जमतंय का पाहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 December 2020

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत युझर्सला चॅलेंज दिलं आहे.

पुणे : रोजच सोशल मीडियावर अनेक विषयानुसार चॅलेंजेस देतात. त्यावरून कोण कधी काय ट्विट करेल आपण त्याची कल्पना ही करू शकणार नाही. त्यात काही गंमतीशीर व्हिडिओ, फोटोज आणि एखादी घटना ओळखायला लावत असतात. अशा अनेक गंमतीजमती सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहावयास मिळत आहे. सामान्य माणूस तर नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. सामान्य माणसांबरोबरच दिग्ग्ज राजकीय नेते सुद्धा मागे राहिले नाही. त्यांच्या ही काही गंमतीजमती रंगत असतातच. या विषयानुसार इतकं सांगत आहे त्याचे कारण तर तुम्ही जाणून घेतल्यावर तुम्हालासुद्धा ही गोष्ट खूप खासच वाटेल. त्यातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत युझर्सला चॅलेंज दिलं आहे.

 

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत जनतेला चॅलेंज दिलेले आहे. कोण ओळखा पाहू??? असा प्रश्न विचारत त्यांनी कॅप्शन दिलं आहे. या फोटोला अनेक युझर्सनी पाहिले असून ७६ लोकांनी रिट्वीट केलेला आहे. तर २१ लोकांनी या फोटोला उत्तर दिलेलं आहे. तर दोन हजार दोनशे लाईक्स मिळाले आहे. तुम्ही ही पहा तुम्हाला फोटोतील व्यक्ती ओळखता येतं की नाही.  

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या फोटोवर अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने कमेंट केलेले आहे. त्यात ज्यांचे विचार आम्ही जपतो आहेत आणि तुमच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम प्रत्येक मुंढे समर्थक करत आहे असे आपले सर्वांचे लाडके संघर्षची व्याख्या ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर समजते असे आदरणीय लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब....!! असं बिक्कड गोविंद नावाच्या युझरने म्हटलं आहे. अनेक युझर्सनी हा फोटो लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचा असल्याच्या कमेंट्स केलेल्या आहेत. तर गणेश वणवे म्हणाले, ज्यांचे विचार आम्ही जपतो आहेत आणि तुमच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम प्रत्येक मुंढे समर्थक करत आहे असे आपले सर्वांचे लाडके संघर्षची व्याख्या ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर समजते असे आदरणीय लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब....!!

 

ट्विटवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनतेला हे चॅलेंज दिलेलं आहे. आतापर्यंत २१ युझर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेक युझर्सनी गोपिनाथ मुंडे यांचा फोटो असल्याच्या कमेंट्स दिलेल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Pankaja Munde has challenged users by sharing photos from his Twitter account