भाजप आमदार कुचेंची जीभ घसरली;म्हणाले, राज्य सरकार पाकिस्तानची औलाद | Narayan Kuche | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla narayan kuche
भाजप आमदार कुचेंची जीभ घसरली;म्हणाले, राज्य सरकार पाकिस्तानची औलाद

भाजप आमदार कुचेंची जीभ घसरली;म्हणाले, राज्य सरकार पाकिस्तानची औलाद

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : भाजपच्या वतीने शुक्रवारी (ता.१२) पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या निवासस्थानावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या ट्रॅक्टर मोर्चा भाषणादरम्यान आमदार नारायण कुचे (BJP MLA Narayan Kuche) यांची जीभ घसरली. श्री. कुचे यांनी हे सरकार पाकिस्तानची औलाद असल्याची जाहीर वक्तव्य केली. जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी व भोकरदनमधील राजूर मंडळातील काही गावांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळण्यात आल्याने शुक्रवारी भाजपने पालमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, हा (Jalna) मोर्चा पोलिसांनी अर्ध्यात रोखल्याने या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

हेही वाचा: त्रिपुरातील घटनेचा नांदेडमध्ये पडसाद,विविध भागांत दगडफेक करत तोडफोड

यावेळी बोलताना आमदार कुचे यांनी राज्य शासनासह पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणादरम्यान त्यांनी हे सरकार पाकिस्तानची औलाद असल्याची जाहीर वक्तव्य केली. दरम्यान श्री. कुचे यांच्या या जाहीर वक्तव्यानंतर त्यांच्याविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुधाकर निकाळजे यांनी कदीम जालना पोलिस ठाणे एका तक्रारीद्वारे केली आहे.

loading image
go to top