MLA Amar Rajurkar
sakal
देगलूर - नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ता. २६ जुलै रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर मतदारसंघातील भाजपच्या संभाव्य उमेदवाराबाबत पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी शनिवारी ता. २७ रोजी देगलूरचा धावता दौरा करून आमदार जितेश अंतापूरकर यांच्या निवासस्थानी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, प्रमुख पदाधिकारी व निवडक मतदारांशी संवाद साधला.