अशोक चव्हाणांना झटका; लोहा नगरपालिकेत भाजपचा डंका

बापू गायखर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे. 

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते. 

भाजपच्या माध्यमातून निवडणुकीचे शिलेदार होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा मतदार संघातील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. विशेषत: सिल्लोडचे माजी मंत्री अब्दूल सत्तार, लातूरचे धीरज देशमुख, कंधार पालिकेचे नगराध्यक्ष अरविंद नळगे आदिंच्या प्रचार सभा गाजल्या असतानाही त्यांचा प्रभाव किंचितही लोहा पालिका निवडणूकीत झाला नसल्याचे स्पष्ट झाले. 

मतदारांनी नवरा-बायकोच्या दोन जोड्या निवडल्या भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी आणि केशवराव चव्हाण मुकदम त्यांच्या पत्नी कल्पना चव्हाण या दोन जोड्या विजयी झाल्या आहेत.

लोहा नगरपालिका निवडणूक निकाल असा:
भाजप 13
काँग्रेस 4

Web Title: BJP won loha municipal council nanded district