esakal | महिला अत्याचाराविरोधात भाजपचे शहरात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

महिला अत्याचाराविरोधात भाजपचे शहरात आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यभरात अत्याचाराच्या घटना घडत आसून हे रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत शनिवारी (ता.११) गजानन महाराज मंदिर चौकात गणरायाची आरती करुन ‘ठाकरे सरकारला सदबुद्धी दे’ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलक महिलांना गजानन महाराज मंदिर चौकात रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले.

आरतीनंतर रस्त्यावर उतरत महिलांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्या महिलांनी चौकात चारही बाजूने येणारे वाहने थांबविले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर जवाहरनगर पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सविता कुलकर्णी, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा माधुरी अदवंत, शहराध्यक्षा अमृता पलोदकर, ओबीसी मोर्च्या प्रदेश कार्यकारिणीतील शालिनीताई बुंधे, मनिषा मुंडे, प्रतिभा जर्हाड, सुनंदा निकम, रुपाली मावळे, गीता आचार्य, वंदना शहा, संगीता शर्मा, दिव्या पाटील, वर्षा साळुंखे, गीता कापुरे, सुवर्णा तुपे, लता सरदार, शिवगंगा जायभाये आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

loading image
go to top